Department of Marathi
About the Department
या महाविद्यालयाची स्थापना २००१ साली झाली असून माझी नियुक्ती जुलै २००५ साली झाली तेव्हा पासून तर आजपर्यंत महाविद्यालयातील मराठी विभाग कार्यरत आहे. विद्यार्थ्यांच्या भाषिक क्षमतेचा विचार करून मराठी भाषा आणि साहित्य हे विषय पदवी स्तरावर शिकविले जातात.शैक्षणिक अभ्यासाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना सह अभ्यासक्रम , व्यावहारिक मराठी व तिचे उपयोजन, भाषा व वाड्.मयीन कौशल्यांवर आधारित अभ्यासघटक , अभ्यासक्रमेत्तर उपक्रम आणि कार्यक्रम, प्रकल्प, शैक्षणिक सहल, तंत्रज्ञानावर आधारित अध्यापन कार्य अशा विविध उपक्रमांसाठी विद्यार्थ्यांना प्रेरित करुन त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्वाचा विकास कसा होईल? यासाठी महाविद्यालयातील मराठी विभागाचे प्राध्यापक सातत्याने प्रयत्नशील आहे. महाविद्यालयातील मराठी विभागाचा विस्तार आणि विकास कसा करता येईल? यासाठी मराठी विभाग कार्यरत आहे.शासन,विद्यापीठ आणि महाविद्यालयीन स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना. सहभागी करून घेण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातो.. मराठी विभागातील सर्वच प्राध्यापक संशोधनाभिमुख असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधन दृष्टी कशी निर्माण होईल? याकडेही मराठी विभागाचे आवर्जून लक्ष असते.आमच्या महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, प्रेरणा आणि नाविन्यपूर्ण अशी डोळस दृष्टी मिळावी हा आमचा दृष्टीकोन आहे.
मराठी भाषा आणि साहित्याचा परिचय विद्यार्थ्यांना करुन द्यावा. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक, नैतिक आणि मानवी जीवन मूल्यें रुजविण्यासाठी सकारात्मक दृष्टी निर्माण करणे. भारतीय संस्कृती चे संचित विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करून विद्यार्थ्यांनीच त्यांचे संगोपन आणि संवर्धन करुन समाजात प्रसार करणे. मराठी भाषा आणि साहित्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भावी यशस्वी जीवनासाठी रोजगाराच्या संधी कशी उपलब्ध करून देता येईल हे सुद्धा मराठी विभागाचे एक लक्ष आहे.
मराठी विभागाचे हे सर्व उद्देश साध्य करुन घेण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी अध्यापन कार्याव्यतिरिक्त व्याकरण विषयक कार्यशाळा, भाषा आणि साहित्य या विषयाशी संबंधित अतिथी व्याख्यान, ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, मराठी भाषा गौरव दिन, मराठी भाषा पंधरवडा, वक्तृत्व, वादविवाद, निबंध, पोस्टर आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. विद्यार्थी हा घटक केंन्द्रिभूत मानून भाषिक आणि वाड्.मयीन कौशल्ये विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वात विकसित कसे होतील या दृष्टिकोनातून मराठी विभाग कार्यक्रमाचे आयोजन करीत असतो.
विभागाचे ध्येय:- मराठी भाषा आणि साहित्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करुन एक सुजाण, समाजशील आणि देशप्रेमी नागरिक निर्माण करणे हे या विभागाचे उद्दिष्ट आहे.